Ticker

6/recent/ticker-posts

तिळसंगरांत : मकर संक्रांत कविता मराठी | मकर संक्रांतीच्या कविता

तिळसंगरांत : मकर संक्रांत कविता मराठी | मकर संक्रांतीच्या कविता

तिळसंगरांत
जानेवारी तिळगुळ कान
बोरांनसाठी फिरो रान
तेव्हाच खेड्यात वान
काय काय करतात दान
वेश भूषा काय भारी
बाईले नवीन सारी
करते काय काय शिंगार
बाई घालते दागीने पार
सगळ्या तिवारा पेक्षा तिळसंग्रात ची बातच न्यारी
प्रत्येक बाई जाते एक मेकाच्या दारों दारी
घेने देने हळद अन कुंकूच लेन
मग जरास नवरयाच नाव घेन
नाकात घातला चमकदार लवंगचादाना
सखु ले नाही चांगल सखारामाले आना
कसा एक हफ्ता पूरा जाते
एक मेकाच्या घरी काय खाते
वर्षातून एकडाव चांगल भेटते फिराले
पण कुणीच ठेवत नाही कुलूप घराले
मानसालें जसा वनवास
भेटत नाही घरी घास
मग नवरयाचं नाव काय घेते
कुठे नवरयाच्या बापाले भेते
आज आहे आमचा दिवस
किती करा लागते नवस
मजीदबेग मुगल "शहजाद"
हिगणघाट जि, वर्धा महाराष्ट्र
8329309229

मकर संक्रांतीची कविता Poem On Makar Sankranti In Marathi


मकर संक्रांतीची कविता Poem On Makar Sankranti In Marathi

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ